






‘सुगम मराठी’ हा अल्पकालीन, कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून सर्व शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन व्यवहारातील सोपी, शुद्ध आणि स्वच्छ मराठीत संवाद आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी रचलेला आहे. व्यवहार्य उपक्रमांच्या माध्यमातून वाचन, संभाषण आणि मूलभूत व्याकरण यात आत्मविश्वास वाढविणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.






